49व्या वर्षी दहावी पास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

आश्वी : घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, सातवीतच शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. पोटापाण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी शाखेत कनिष्ठ ट्रॅकमॅन म्हणून काम करताना शिकलेल्या मुलांच्या प्रेरणेमुळे त्यांनी उर्वरीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रशाळेत शिकून या वर्षी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले. मुळचे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील नानासाहेब नागरे ( वय 49 ) यांची शिक्षणाची धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आहे.

चरितार्थासाठी थेट मुंबई गाठलेल्या नागरे यांना मध्यरेल्वेत रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करणारे ट्रॅकमॅन म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या चार मुलं असून त्यातील एक मुलगा अभियंता आहे. मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करताना, आपल्या राहिलेल्या शिक्षणाची रुखरुख त्यांच्या मनात होती. त्यांनी नोकरी सांभाळून परळच्या शिवाजी रात्रशाळेत प्रवेश घतला. ठाणे येथील राहत्या घरातून पहाटे सहा वाजता, शाळेच्या दप्तरासह ते बाहेर पडत असे. दीवा स्थानकातील कामकाजानंतर परळच्या रात्रशाळेतील अभ्यास संपवून पुन्हा ठाण्याला परत येत असे. शिक्षणाची उमेद आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर, कोणत्याही वयात काहीही अशक्य नसल्याचे नानासाहेब नागरे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांना या वर्षी दिलेल्या दहावीच्या परीक्षेत 50. 40 टक्के गुण मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्याविषयी पूर्ण माहिती असलेल्या त्यांच्या मित्र परिवार व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
 
Web Title: 10th passes at 49th year