1,100 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक लढलेल्या सुमारे 2200 उमेदवारांपैकी सुमारे 1100 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही एकूण रक्कम 38 लाख 37 हजार 500 रुपये आहे. 

महापालिकेच्या सर्व 227 मतदारसंघांची अधिकृत आकडेवारी अजून हाती आलेली नाही. 35 प्रभागांमधील उमेदवारांच्या मतांचे आकडेही अजून हाती आलेले नाहीत. मतमोजणीनंतर तीन दिवस सलग सुट्या आल्याने ही आकडेवारी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार एक हजार 57 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. जप्त झालेल्या अनामत रकमेचा आकडा 40 लाख रुपयांवर जाऊ शकतो.

Web Title: 1,100 candidates to deposit seized