'ईडी'कडून 11,286 कोटींची मालमत्ता जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

काळ्या पैशाप्रकरणी कारवाई; देशभरात 104 गुन्हे दाखल
मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) मागील आर्थिक वर्षात देशभर 104 गुन्हे दाखल केले असून, 11 हजार 286 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

काळ्या पैशाप्रकरणी कारवाई; देशभरात 104 गुन्हे दाखल
मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) मागील आर्थिक वर्षात देशभर 104 गुन्हे दाखल केले असून, 11 हजार 286 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

परकी चलन विनिमय कायद्यानुसार (फेमा) गेल्या आर्थिक वर्षात 1 हजार 393 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला. सर्वाधिक म्हणजे 60 हून अधिक गुन्हे नोटाबंदीच्या कालावधीत दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. "फेमा'नुसार दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशभरात 538 जणांना नोटीस पाठवण्यात आल्या. त्यात अनेक व्यावसायिक व सेलिब्रिटींचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये 4 हजार 675 कोटींचे परकी चलन बुडवल्याचा संशय आहे.

काळ्या पैशांशी संबंधित सर्वाधिक गुन्हे हे नोटाबंदीच्या कालावधीत दाखल करण्यात आले. देशभरात सुमारे 70 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात "फेमा' आणि "पीएमएलए'नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतील राजेश्‍वर एक्‍स्पोर्ट प्रकरण त्यापैकीच आहे. नोटाबंदीच्या काळात बॅंक खात्यात 92 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी आल्यानंतर "ईडी'च्या रडावर आलेल्या राजेश्वर एक्‍स्पोर्ट कंपनीमार्फत वर्षभरात 1 हजार 478 कोटी रुपये हॉंगकॉंग आणि दुबईत पाठवल्याचे उघडकीस आले होते.

मुंबईत सातशे बनावट कंपन्या
राजेश्‍वरी एक्‍स्पोर्ट प्रकरणानंतर मुंबईसह देशभर बनावट कंपन्यांवर छापे टाकण्यात आले होते. मुंबईत सातशेहून अधिक बनावट कंपन्या आहेत. त्यांच्यामार्फत काळा पैसा पांढरा करण्याच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश करण्यात "ईडी'ला यश आले. वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकप्रकरणीही "ईडी'ने नुकतीच 18 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Web Title: 11,286 crore property seized by idi