बेस्टच्या वीजचोरीबद्दल 1142 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - बेस्टच्या दक्षता पथकाने वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये छापे घालून वीजचोरीची 2017 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. घरगुती ग्राहक, वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, इंडस्ट्रियल युनिट येथील छाप्यांतून 38 कोटींची वीजचोरी पकडून 1142 जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत 55 जणांवर कारवाई करण्यात आली; तर 25 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. वीजचोरीच्या या प्रकरणांमुळे बेस्टची 18 लाख 30 हजार युनिट इतक्‍या प्रमाणात वीजगळती झाली. बेस्टच्या दक्षता पथकाने सायन-कोळीवाडा, वरळी, फोर्ट, दोन टाकी, नागपाडा, भायखळा, एल्फिन्स्टन रोड यांसारख्या ठिकाणी छापे टाकले.

मुंबई - बेस्टच्या दक्षता पथकाने वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये छापे घालून वीजचोरीची 2017 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. घरगुती ग्राहक, वाणिज्यिक आस्थापना, दुकाने, इंडस्ट्रियल युनिट येथील छाप्यांतून 38 कोटींची वीजचोरी पकडून 1142 जणांना अटक करण्यात आली. या मोहिमेत 55 जणांवर कारवाई करण्यात आली; तर 25 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. वीजचोरीच्या या प्रकरणांमुळे बेस्टची 18 लाख 30 हजार युनिट इतक्‍या प्रमाणात वीजगळती झाली. बेस्टच्या दक्षता पथकाने सायन-कोळीवाडा, वरळी, फोर्ट, दोन टाकी, नागपाडा, भायखळा, एल्फिन्स्टन रोड यांसारख्या ठिकाणी छापे टाकले. काही ठिकाणी माफियांमार्फत, काही भागांत पिण्याच्या पाण्यासाठी मोटारीचा वापर वीजचोरीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले. 

Web Title: 1142 people arrested for BEST's power purchase