
डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामध्ये काही जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 07 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर विखे पाटील यांनी या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
कोसळलेली इमारत निवासी असल्याचे समजते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी साडे अकराच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती स्थानिकांनी आपत्कालीन विभागाला दिली.