महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष लोकल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण आणि कुर्ला ते वाशी-पनवेल या मार्गांवरील विशेष लोकलमुळे आंबेडकरी अनुयायांना दिलासा मिळणार आहे. 

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून कुर्ला-दादर विशेष लोकल मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी, कल्याण-दादर लोकल मध्यरात्री 1 वाजता, ठाणे-दादर लोकल मध्यरात्रीनंतर 2 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. दादर-ठाणे लोकल मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांनी, दादर-कल्याण लोकल मध्यरात्रीनंतर 2 वाजून 25 मिनिटांनी आणि दादर-कुर्ला लोकल पहाटे 3 वाजता चालवण्यात येईल. 

हार्बर मार्गावर वाशी-कुर्ला लोकल मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनी, पनवेल-कुर्ला लोकल मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी आणि वाशी-कुर्ला लोकल शुक्रवारी पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी सोडण्यात येईल. कुर्ला-वाशी लोकल पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी, कुर्ला-पनवेल लोकल पहाटे 3 वाजता, कुर्ला-वाशी लोकल पहाटे 4 वाजता सुटेल. प्रवाशांनी या विशेष लोकलचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.  

web title : 12 special trains of Central Railway on Mahaparinirvan Day

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 special trains of Central Railway on Mahaparinirvan Day