
Mumbai : राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा होणार पुर्नविकास; मुंबईतील २८ स्थानकांचा समावेश
मुंबई : भारतीय रेल्वेवरील रेल्वे स्टेशनांच्या विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. सध्या, या योजनेत देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा समावेश असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील १२३ स्थानकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई विभागातील अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, भायखळा, चर्नी रोड, सीएसएमटी, चिंचपोकळी, दादर, जोगेश्वरी, कल्याण, कांजूरमार्ग, कुर्ला, एलटीटी, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मरिन लाईन्स, माटुंगा, मुंब्रा, मुंबई सेंट्रल,
स्टॅडहर्स्ट रोड, टिटवाळा, विद्याविहार, विक्रोळी, ठाणे, वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या १५ तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा ही अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत विविध विकास कामे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे या योजने’अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुर्नविकासाची घोषणा करण्यात आली. याकरिता यंदाचा अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
अशी आहेत योजना ?
अमृत भारत स्टेशन योजनेत ही दीर्घकालीन दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. यामध्ये स्थानकारील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकानावरील सुविधा सुधारणे, फिरणारे क्षेत्र, प्रतीक्षालय, शौचालये, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय,
स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क, ’एक स्टेशन एक उत्पादन’ योजनेच्या अंतर्गत प्रत्येक स्टेशनवरील गरज लक्षात घेऊन उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित जागा, लँडस्केपिंग इत्यादी. या योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्टेशनचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांग व्यक्तिंसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, आवश्यकतेनुसार ’रूफ प्लाझा’, टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्यता आणि निर्मिती दीर्घकालीन स्टेशनवर शहर केंद्रे समाविष्ट आहेत.