वसई-विरार शहरात धोकादायक इमारतींवर हातोडा, पालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात

demolition
demolition

वसई : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करत 13 अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. भविष्यात नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही पावले उचलण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

शहर महापालिका हद्दीत 191 अतिधोकादायक; तर 360 धोकादायक इमारती आहेत. महापालिका घर रिकामे करण्यासाठी दरवर्षी नोटीस बजावत असते, परंतु अनेक इमारतीत जीव धोक्‍यात टाकून रहिवासी वास्तव्य करतात. काही महिन्यांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील एक इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून अशा धोकादायक इमारतीत रहिवाशांनी राहू नये असे आवाहन केले जात आहे. तसेच अतिधोकादायक इमारती पाडण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ए (1) बी (5) ई (3) एच व आय (प्रत्येकी 2) अशा चार प्रभागांतील एकूण 13 इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. 

अनधिकृत इमारती बांधल्या जाताना कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो. त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. महापालिका अनधिकृत इमारतींवर कारवाई करत असली, तरी अपुरे मनुष्यबळ पाहता कारवाई तोकडी पडत असल्याने महापालिकेने घरपट्टी न लावण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु यालाही न जुमानता अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले जात असल्याचे समजते. त्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई झाली तर बांधकामांना रोखता येईल, असे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. 

वसई-विरार शहरातील अतिधोकादायक व धोकादायक वर्गीकरण असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून इमारती निष्कासित केल्या जात आहेत. तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. तसे आदेश प्रत्येक प्रभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका. 

(संपादन : वैभव गाटे)

13 dangerous buildings demolished in Vasai-Virar city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com