14 राजकीय पक्षांना निवडणुक आयोगाचा झटका; भाजप, काँग्रेसचाही समावेश

Election-Commission-Office
Election-Commission-Office

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त १४ राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून, १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. सहारिया यांनी सांगितले, नोटीस बजावण्यात आलेल्या राजकीय पक्षांची नावे - भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,  शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (धर्मनिरपेक्ष), समाजवादी पक्ष, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन आणि जनता दल (संयुक्त).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com