लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर

सुमित बागुल
Friday, 30 October 2020

मुंबईतील या १४ वर्षीय मुलाचं नाव आहे सुभम, हा १४ वर्षीय मुलगा मुंबईतील भेंडीबाजार, नागपाडा भागात चहा विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो.

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. अनेकांना सक्तीच्या सुटीवर जायला लागलंय, अनेकांचे पगार आता नोव्हेंबर उगवतोय तरीही अद्यापही कापून येतोय. अशातच दररोजचा दिवस कसा ढकलायचा हा प्रश्न अनेकांना आजही सतावतोय.

याचंच उदाहरण मुंबईतलं पाहायला मिळतंय. कोरोना, कोरोनामुळे सुरु झालेला लॉकडाऊन आणि त्यामुळे सक्तीने बंद झालेले नोकरी धंदे यामुळे मुंबईतील १४ वर्षीय लहानग्यावर स्वतःचं घर चालवण्याची वेळ आली आहे. हा लहानगा चहा विकून आपलं घर चालवतोय.

लॉकडाऊनमुळेच माझ्यावर चहा विकायची वेळ आली असं या मुलाने ANI या वृत्तसंस्थेला सांगितलंय.

महत्त्वाची बातमी : ST महामंडळाचा मोठा निर्णय; आगार तारण ठेवून घेणार २ हजार कोटींचं कर्ज

महत्त्वाची बातमी : मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकरांना फोन, शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

मुंबईतील या १४ वर्षीय मुलाचं नाव आहे सुभम, हा १४ वर्षीय मुलगा मुंबईतील भेंडीबाजार, नागपाडा भागात चहा विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो. त्याची आई एका शाळेतील बसवर अटेंडंट म्हणून काम करत होती. मात्र लॉकडाऊनमुळे आईचं काम बंद झालं. त्यामुळे आईचा पगार देखील बंद आहे. म्हणून त्यांनी स्वतःचं चहाचे दुकान सुरु केले आहे. त्याची बहीण सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करतेय, तर आपणही शाळा सुरु झाल्यावर अभ्यास सुरु करणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्याच्या वडिलांचं १२ वर्षांपूर्वी निधन झालंय.  

14 years old boy from nagpad sells tea to support his family amid lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 years old boy from nagpad sells tea to support his family amid lockdown