बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 140 जणांना मिळाला रोजगार

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून 140 जणांना मिळाला रोजगार

मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या मेळाव्यात निवड झालेल्या 104 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे तीन हजार इच्छुकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. एकूण 67 कंपन्यांची यासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 50 कंपन्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. 1 हजार 394 मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी 755 जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. 104 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

उद्योग विभाग राबवत असलेल्या या उपक्रमाला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केले. या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. प्रत्येकाला नोकरी देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

(सौजन्य : डीजीआयपीआर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com