मुंबई : 14 हजार सरकारी शाळांची तात्काळ वीज जोडणी होणार पूर्ववत

वीज बिल न भरल्याने अंधारात असलेल्या 14 हजार 148 शाळांची तातडीने वीज जोडणी केली जाणार ; वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad
Varsha Gaikwadsakal

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या आणि मागील काही महिन्यांपासून वीज बिल न भरल्याने अंधारात असलेल्या 14 हजार 148 शाळांची तातडीने वीज जोडणी केली जाणार आहे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज या शाळांची वीज बिलापोटी असलेली तब्बल 14 कोटी 18 लाख रुपयांची थकीत वीज बिलाची रक्कम महावितरणकडे भरण्यात आली असल्याची माहिती दिली.

दोनच दिवसांपूर्वी 'सकाळ'ने रायगड जिल्ह्यातील दीड हजारहून अधिक शाळांची वीज खंडित केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यासोबतच याविषयी विधानमंडळात झालेल्या चर्चेनंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शिक्षक आमदार नागो गाणार यांना लिहिलेल्या पत्राची माहितीही दिली होती, तशी सरकारकडून गंभीर दखल घेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या वीज कापलेल्या 14 हजार 148 शाळांची तातडीने वीज जोडणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासोबतच महावितरणकडे थकीत वीज बिलाची रक्कम आज भरली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदेच्या 60 हजार 801 शाळा शाळांपैकी तब्बल चार हजार 566 शाळांना आतापर्यंत वीज जोडणी होऊ शकले नाही त्यामुळे त्या कायमच्या अंधारात आहेत. तर 14 हजार 148 शाळांची थकित वीज बिले न भरल्याने वीज खंडित करण्यात आली आहे. यामध्ये काही शाळा मागील काही वर्षांपासून वीज मीटर ही कापले असल्याने त्या अंधारात आहेत. शाळांची विज तातडीने सोडून ती पूर्ववत केली जाणार आहे.

यासोबतच राज्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना आकारण्यात येणाऱ्या बीज बिलाच्या मीटरची ही तपासणी केली जाणार आहे. शाळांना मिळणाऱ्या वीज मीटरमध्ये वर्गवारीनुसार बीज आकारले जाते काय याची तपासणीही केली जाणार आहे त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com