15 बाल कामगारांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - नागपाडा येथील कपडे आणि बॅगांच्या कारखान्यात मुंबई पोलिसांच्या "जापू' (ज्युवेनाईल एड पोलिस युनिट)ने छापा घालून 15 बाल कामगारांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. नागपाडा येथील गुलशन कम्पाऊंडमधील बॅगा व कपड्यांच्या कारखान्यात बाल कामगार असल्याची माहिती "जापू' शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आर. बी. माने यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलिसांनी छापा घातला. बाल कामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित कारखान्यांचे मालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांना अटक केली.
Web Title: 15 Child Worker Release Crime