१५ कोटींचे ड्रग्स  जप्त; दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ३० किलो सिंथेटिक ड्रग्स मेथेकुलोन तस्करीप्रकरणी दोघांना अटक केली. जप्त केलेल्या या अमली पदार्थाची किंमत १५ कोटी रुपये आहे. भावेश शाह (रा. गोरेगाव) व सुनील धुतिया (रा. गिरगाव) अशी अटक  आरोपींची नावे आहेत. ते खाद्यपदार्थ  असल्याचे भासवून ड्रग्स अमेरिकेत पाठवत होते. ओम कार्गो इंटरनॅशनल कुरिअरमार्फत आलेल्या या पॅकेटमधील ३० किलो मेथेकुलोन पावडर, एक लाख १८ हजार सिल्डीफिड गोळ्या व ७५ हजार प्रतिबंधित गोळ्या डीआरआयने जप्त केल्या. 

Web Title: 15 crore drugs seized

टॅग्स