मीडिया ग्रुपला 15 कोटींना फसवले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - प्रसिद्ध मीडिया ग्रुपच्या डोमेनवर लेख प्रसिद्ध केल्याचे भासवून 15 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने 18 जणांना अटक केली. तक्रारदार कंपनीच्या पडताळणीत असे लेख आणि साहित्य प्रत्यक्षात प्रसिद्धच न झाल्याचे उघड झाले होते; मात्र आरोपींच्या खात्यावर त्याची रक्कम जमा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. 

प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सहयोगी कार्यकारी संपादकांनी ही तक्रार केली आहे. 2013 ते 2015 या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. त्यात 15 कोटी सात लाख 16 हजार 320 रुपये 72 खात्यांमध्ये जमा करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याप्रकरणी सुरुवातीला आझाद मैदान पोलिस ठाण्यात भादंवि कलम 408, 420, 465, 467, 468, 471, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. नुकतीच गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खात्यावर रक्कम जमा झालेल्या 18 जणांना अटक केली.

Web Title: 15 crores fraud in mumbai