कचरा वर्गीकरणासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चार प्रभाग क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचा प्रयोग होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत कचरा वर्गीकरणासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. 15 दिवसांच्या आत वर्गीकरण केले नाही तर कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

1 डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, अशा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या; मात्र अजूनही वर्गीकरणाची प्रक्रिया बहुतांश सोसायट्यांमधून झालेली नाही. याबाबत सुमारे दहा हजार सोसायट्यांना नोटिसा जारी करून पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कचरा वेगळा करून दिला नाही तर कचरा उचलला जाणार नाही, अशी तंबी आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली आहे. 

Web Title: 15 day ultimatum for garbage classification