मुंबईत बेस्ट बसमध्ये १५ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime news

एका किशोरवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना बेस्ट बसमध्ये लैंगिक छळ केल्या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत बेस्ट बसमध्ये १५ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ

मुंबई - एका किशोरवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना बेस्ट बसमध्ये लैंगिक छळ केल्या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी नराधमाचा शोध सुरू आहे. जूनमध्ये घरी परतत असताना 121 क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये 15 वर्षीय मुलीचा छळ करण्यात आला होता, मात्र गेल्या आठवड्यात तिला तिच्या बसमध्ये तोच आरोपी दिसला तेव्हा तिने ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी संदर्भात मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 354-ए, 354-डी, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदविला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जूनमध्ये घडली, गिरगाव परिसरात राहणारी पीडित मुलगी घरी जात होती. त्या दिवशी पिडीत विद्यार्थिनीने जे मेहता बस स्टॉपवरून दुपारी 2.30 च्या सुमारास 121 क्रमांकाच्या बसमध्ये चढली. बस ग्रँट रोड येथील नाना चौकाजवळील पुलावर पोहोचणार असतानाच आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिने काही करण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. घरी पोहोचल्यानंतर पीडितेने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला, मात्र तेव्हा त्यांनी पोलिसांकडे न जाणे पसंत केले. अल्पवयीन मुलीच्या मित्राने आरोपीचा व्हिडीओही बनवला होता, ज्याच्या मदतीने पोलीस आता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: 15 Year Girl Student Sexually Harassed In Best Bus In Mumbai Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..