दिड हजार टिबी रुग्णांना गोळ्या खाल्यानंतर मिसकॉलची सक्ती

दिनेश गोगी
शनिवार, 24 मार्च 2018

उल्हासनगर : शहरात असलेल्या दिड हजार टीबी रुग्णांना ज्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, त्या खाल्यानंतर त्यांच्या मोबाईल वरून मिसकॉल देण्याचा फतवा उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केला आहे. मात्र जे लावारीस आहेत आणि त्यांच्याकडे मोबाईलच नाही अशा रुग्णांच काय? असा सवाल शिवसेना अपंग सहाय्य सेनेने उपस्थित केला आहे.

उल्हासनगर : शहरात असलेल्या दिड हजार टीबी रुग्णांना ज्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, त्या खाल्यानंतर त्यांच्या मोबाईल वरून मिसकॉल देण्याचा फतवा उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केला आहे. मात्र जे लावारीस आहेत आणि त्यांच्याकडे मोबाईलच नाही अशा रुग्णांच काय? असा सवाल शिवसेना अपंग सहाय्य सेनेने उपस्थित केला आहे.

आज उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात जागतिक क्षयरोग (टी.बी) दिवस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ.जाफर तडवी, डॉ.दिलीप पगारे, जनार्धन निंभोरे, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष भरत खरे, क्षयरोग कक्षाचे वर्षा फटकाळे, सुहास बनसोडे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून महिनाभर पुरेल असे टी.बि. उपचारावरील गोळ्यांचे पाकीट 1500 रुग्णांना देण्यात आले आहे. त्या पाकिटावर 2 व 3 आणि 5 दिवसाआड गोळ्या घेण्यात याव्या व त्या गोळ्या उघडताच मागील बाजूस असलेल्या टोल फ्री नंबर वर रुग्णांनी त्यांच्या मोबाईल वरून मिसकॉल द्यावा. असे नमूद करण्यात आल्याची माहिती डॉ.राजा रिजवानी यांनी दिली. रुग्णांनी नियमित गोळ्या घ्याव्यात टीबीवर मात करावी.हा त्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

त्यावर मोठया प्रमाणात, रेल्वे स्थानक, बस स्टॉप, स्कायवॉक, रस्त्याच्या कडेला झोपणारे भिकारी असे वालीच नसणारे लावारीस टीबीचे रुग्ण आहेत. त्यांच्या कडे मोबाईल नसून रुग्णालय गाठण्यासाठी रिक्षा भाड्याची व्यवस्था नसते. गोळ्या खाऊन झाल्यावर ज्यांच्याकडे जेवणाची सोय नसते. असे रुग्ण मिसकॉल कसे देऊ शकतात?असा सवाल भरत खरे यांनी उपस्थित केला.

याविषयी डॉ.राजा रिजवानी यांची भेट घेतली असता, लावारीस रुग्णांसाठी लोकसेवी सामाजिक संस्थानी पुढे यावे. त्यांनी त्यांचे आरोग्य विभागाकडे मोबाईल नंबर द्यावेत. रुग्णांनी गोळ्या घेताच मिसकॉल द्यावा. खरे यांनी या रुग्णांच्या उत्तर दायित्वाची जबाबदारी स्विकारल्यास त्यांच्याकडे गोळ्या देण्यात येतील. असे डॉ.रिजवानी यांनी स्पष्ट केले.

Web Title: 1500 patients have to give missed call after take medicine