कल्याणमध्ये एकाच दिवशी 16 जणांना श्‍वानदंश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

कल्याण परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 16 जणांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. 5) घडली.

कल्याण : कल्याण परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 16 जणांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. 5) घडली. जखमींवर पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे शहरात भटक्‍या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. 

कल्याण पूर्वमधील समर्थनगरनजीक एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत अनेकांना जखमी केले. मोतीराम पावशे, अवदेश रजक, कृष्णा कांबळे, दशरथ भालेराव, सलीम सुभान, अमर आढाव, सृष्टी भोळे, मुकेश जाधव, प्रमोद सतलानी, अमोल पाठक, सुजल जाधव, नम्रता नागरे, भारेश भालेराव, सखाराम गायकवाड, इना मना, सचिन रजक असे जखमींचे नावे आहे. भटक्‍या कुत्र्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येताच पालिकेकडे तक्रार केली; मात्र कुत्रे पकडणाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय ते कारवाई करत नसल्याचा आरोप नगरसेवक राजाराम पावशे यांनी केला आहे. आगामी महासभेत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याला पालिकेच्या श्वान पथकाने पकडून नेताना त्याचा मृत्यू झाला. 
----- 
कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींवर रुख्मिणीबाई रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर करणार आहोत. 
- डॉ. राजू लवांगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 people bitten by dog