उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून 16 वर्षीय मुलाचा खून

दिनेश गोगी
बुधवार, 10 एप्रिल 2019

उल्हासनगर - क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारामारीमुळे एकाने 16 वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. 

उल्हासनगर - क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारामारीमुळे एकाने 16 वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. 

कॅम्प नंबर 2 मधील आझादनगर परिसरात 23 वर्षीय बिपीन यादव व 16 वर्षीय सुंदरम निशाद राहतात. एका महिन्यापूर्वी सुंदरमने बिपीनला मारहाण केली होती. तेंव्हापासून बिपीन हा सुंदरमचा वचपा काढण्याच्या बेतात होता. काल रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सुंदरम हा आझादनगरातील बुद्धनगर चौकात आला असता. बिपीन याने धारदार शस्राने वार करून सुंदरमचा खून केला. याबाबत सुंदरम याचा मोठा भाऊ संजय निशाद याने दिलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.जी.माने यांनी बिपीन यादव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बिपीन फरार झाला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्याशी संपर्क साधला असता, महिन्यापूर्वी सुंदरमने बिपिनला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला. बिपीनच्या पाश्वभूमी विषयीची माहिती घेण्यात येत असून, त्याला पकडण्यासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती सुशील जावळे यांनी दिली.

Web Title: 16 year old murdered in Ulhasnagar