कौतुकास्पद! कोरोनाकाळात 1 हजार 600 कर्करूग्णांवर टाटा रुग्णालयात शस्त्रक्रिया; उपचाराचा वेग वाढवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौतुकास्पद! कोरोनाकाळात 1 हजार 600 कर्करूग्णांवर टाटा रुग्णालयात शस्त्रक्रिया; उपचाराचा वेग वाढवला

टाटा रूग्णालयात साधारणपणे दरमहा 400 शस्त्रक्रिया हे प्रमाण असून यात अनेक करोना रुग्णांचा समावेश आहे.

कौतुकास्पद! कोरोनाकाळात 1 हजार 600 कर्करूग्णांवर टाटा रुग्णालयात शस्त्रक्रिया; उपचाराचा वेग वाढवला

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड


मुंबई : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून बहुतांश रूग्णांचा कल शस्त्रक्रिया टाळण्याकडे होता. टाटा मेमोरियल रुग्णालयाने या बिकट परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने मे ते ऑगस्ट दरम्यान कर्करूग्णांवरील निवडक पण तातडीच्या तब्बल 1 हजार 600 यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. आता उपचारांचा वेगही रुग्णालयाने वाढवला आहे. मे ते ऑगस्टमध्ये तब्बल सहा हजार नवीन कर्करुग्ण उपचारासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये आले.  
रुग्णालयात पोहचण्यासाठीची समस्या, डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांमध्ये असलेली भीती यासंख्या अनेक अडचणी समोर होत्या. या बिकट परिस्थितीत टाटा मेमोरियल रुग्णालयाने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला.

ठाणे जिल्ह्यात 21 लाख नागरिक होम क्वारंटाईन; दररोज 15 ते 20 हजार नागरिकांची भर

रुग्णांनाही कर्करोग असताना कोरोना झाला तरी शस्त्रक्रिया होतील, असा विश्वास दिला. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग असताना धोका अधिक असेल हे लक्षात घेत रुग्णालयातील ‘टीम वर्क’मुळे  तब्बल 1 हजार 600 यशस्वी शस्त्रक्रिया करता आल्या, अशी माहिती डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली.   कोरोनाचा अमेरिका , इटली आणि स्पेन मधील मृत्यू दराच्या कित्येक पट  कमी मृत्यू दर भारतात असल्याचेही डॉ. श्रीखंडे म्हणाले.
टाटा रूग्णालयात साधारणपणे दरमहा 400 शस्त्रक्रिया हे प्रमाण असून यात अनेक करोना रुग्णांचा समावेश आहे. करोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व त्याबाहेर स्वतंत्रपणे बेडची तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.   

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम 

देशभरात उपचार सुरू करण्यासाठी प्रयत्न
देशभरात वेगवेगळ्या   रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार सुरु व्हावेत यासाठी डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी 23 मार्च ते 30 एप्रिल या काळात टाटा रुग्णालयात 37 दिवसांत 494 शस्त्रक्रिया केल्या. या अनुभवावर आधारित हार्वर्डच्या ‘अॅनल्स ऑफ सर्जरी’ या जर्नलमध्ये डॉ. श्रीखंडे यांचा शोधनिबंधही प्रसिद्ध झाला. 

 लॉकडाऊन शिथिल केल्याने कोरोना रुग्णसंख्येचा धोका आहे. त्या प्रमाणे उपचारांचा वेगही वाढवला आहे. जास्तीत जास्त गरीब कर्करुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये आज उपचार केले जात असून आगामी काळात कर्करोग रुग्णांवरील उपचाराचा वेग आणखी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-डॉ. शैलेश श्रीखंडे,
उप संचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top