सायकल ट्रॅकच्या पहिल्या टप्प्यासाठी 161 कोटी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या 14 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिका 161 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मुंबईतील 36 किलोमीटर लांबीच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूच्या झोपड्या हटवल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या बाजूने महापालिका सायकल व जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. या सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा मुलुंडपासून सहारा रोडपर्यंत बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्तेही बनविण्यात येणार आहेत.

मुंबई - मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या 14 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिका 161 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मुंबईतील 36 किलोमीटर लांबीच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूच्या झोपड्या हटवल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या बाजूने महापालिका सायकल व जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. या सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा मुलुंडपासून सहारा रोडपर्यंत बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्तेही बनविण्यात येणार आहेत. तसे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: 161 crores for the first phase of the cycle track