पालिका रुग्णालयांत पावसाळी आजारांसाठी 1 हजार 678 खाटा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - पावसाळी आजारांची शक्‍यता लक्षात घेता पालिका रुग्णालयांत तब्बल एक हजार 678 खाटा अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 7) अतिरिक्त खाटांचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आला. 

मुंबई - पावसाळी आजारांची शक्‍यता लक्षात घेता पालिका रुग्णालयांत तब्बल एक हजार 678 खाटा अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 7) अतिरिक्त खाटांचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आला. 

लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि डेंगीमुळे दर वर्षी पावसाळ्यात पालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढते. त्या आजारांची शक्‍यता लक्षात घेऊन पालिका रुग्णालयांत अतिरिक्त खाटांची सोय करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी तब्बल एक हजार 200 खाटा तयार होत्या, अशी माहिती पालिका आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. परंतु, आठवड्याच्या शेवटी मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला गेल्याने खाटांमध्ये वाढ करत संपूर्ण अहवाल पालिका आरोग्य विभागाला पाठवण्यात आल्याचे समजते. व्हायरल आजारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विविध रुग्णालयांतील बाल विभागात 292, जनरल वॉर्डमध्ये 644 आणि सर्जरी, ईएनटी, त्वचारोग आदी विभागांत 792 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास खाटांमध्ये वाढ करण्यात येईल, अशी माहिती पालिका वैद्यकीय रुग्णालयाचे संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. 

Web Title: 1678 beds for municipal diseases in municipal hospitals