महाडमध्ये वीज पडून 17 जण जखमी

महाडमध्ये वीज पडून  17 जण जखमी

महाड: तालुक्‍यातील मुमुर्शी आदिवासी वाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (ता. 22) सायंकाळी 8 वाजता ही घटना घडली. जखमी झालेल्या सर्व आदिवासींवर तालुक्‍यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. 

महाड तालुक्‍यामध्ये काही दिवसांपासून दररोज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. आजही सायंकाळी सुरू झालेल्या पावसात महाड तालुक्‍यातील मुमुर्शी आदिवासी वाडीवरती वीज पडली. या विजेमुळे आदिवासी वाडीतील झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; तर सायंकाळी आपले काम उरकून झोपडीत आलेल्या आदिवासींच्या अंगावर ही वीज पडली. वीज पडल्याचे समजताच येथील शाखाप्रमुख संजय पार्टे, तय्यब पोवेकर, पोलिस पाटील संजय सकपाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि याबाबतचे वृत्त प्रशासनालाही कळवले. येथे सर्व जखमींना माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ठाकरे, माजी सभापती सीताराम कदम, संजय दळवी व तलाठी पाटील यांच्या मदतीने त्वरित विन्हेरे येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांवरती उपचार सुरू आहेत. 

जखमी व्यक्ती 
या घटनेतील हिरा निकम (वय 25), विलास पवार (30), सीता जाधव (32), रमेश जाधव (17), दत्ताराम पवार (32), चंद्रा पवार (30), शांताराम काटकर (55), भीमा काटकर (45), मंदा पवार (32), सनी पवार (15), सुषमा जाधव (28), सुजाता जाधव (60), रेश्‍मा वाघमारे (18), रूपेश पवार (9), निकिता पवार (13), तारा पवार (50), दिशा पवार (एक वर्ष) अशी 17 जखमींची नावे आहेत. त्यापैकी काही जखमींना सलाईन लावण्यात आले आहे. याबाबत येथील तलाठी पाटील यांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com