12 वर्षीय मुलामुळे 17 वर्षीय मुलगी गरोदर

12 वर्षीय मुलामुळे 17 वर्षीय मुलगी गरोदर

मोखाडा : मोखाड्यात प्रेम प्रकरणातून तसेच शारीरिक आकर्षणातून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. मोखाड्यातील दांडवळ येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची घटना समोर आली. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित मुलगी तपासणीसाठी गेली असता ही बाब उघडकीस आली. तिच्या जबाबानंतर मोखाडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीने त्याच गावात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलावर आरोप केले आहेत. 

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दांडवळ येथील अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी आपल्या पालकांसोबत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली होती. त्यावेळी सदरची मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या घटनेविषयी तेथे प्राथमिक नोंद करून मोखाडा पोलिसांना कळविण्यात आले. मोखाडा पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदविला असता याच गावातील एका अल्पवयीन मुलाचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित मुलीस मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले आहे. संबंधित अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, वर्षभरात बाल लैंगिक अत्याचाराच्या (पॉस्को) तीन ते चार घटना घडल्या आहेत. या घटना प्रेम प्रकरण तसेच तारुण्यात पदार्पण करताना शारीरिक आकर्षणातून घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com