Gold Seized : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 किलो सोने जप्त; 7 विदेशी महिलांना अटक

10 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
Gold seized
Gold seizedsakal
Summary

10 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

मुंबई - सुमारे 10 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. आरोपी महिलांकडून 18 किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ, जैनाब मोहमुद या महिलांना सीमाशुल्क अटक करण्यात आली. या सर्व कापड विक्री व्यवसायाशी संबंधित असून त्या 26 ते 47 वयोगटातील आहेत.एवढय़ा मोठय़ा प्रमाणात परदेशी महिलांना सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्याची आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे.

केनिया एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर आलेल्या नऊ महिलांना मंगळवारी सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाच्या एआयय युनीटच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांना तस्करी करून काही वस्तू आणल्याबाबत विचारले असता महिलांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यासाठी त्यांना थांबवून एका खोलीत बसवण्यात आले. त्या वेळी आरोपी महिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

त्यांना पुन्हा प्रवेशद्वाराजवळून एआययूच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.तपासणीत त्यांच्याकडे 25 कॅरेटच्या 13 हजार 640 ग्रॅम सोने सापडले. 21 कॅरेटचे 2340 ग्रॅम व 18 कॅरेटचे 1136 ग्रॅम सोने तसेच 1136 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. आरोपी महिलांकडून एकूण 18 किलो 280 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी 42 लाख रुपये आहे. या प्रकरणी सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 7 महिलांना सीमाशुल्क अटक करण्यात आली.

मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीप्रकरणी मोठय़ा प्रमाणात परदेशी महिलांना अटक होण्याची ही आठवडय़ातील दुसरी घटना आहे. त्यापूर्वी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने सुदान देशाच्या नागरिक असलेल्या 18 महिलांना अटक केली होती. त्यांच्याकडून 10 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com