नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 18 वर्षाच्या विवाहित महिलेवर 3 जणांनी तिच्या राहत्या घरातच सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पीडित महिलेच्या पतीला ही मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 14) रात्री 10 च्या सुमारास नालासोपारा पोलिस ठाण्यात यासंबंधित गुन्हा दाखल झाला असून या घटनेतील 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
इस्तीयाक रहमत अली शेख उर्फ समीर (वय 39), सिद्धेश विलास पेडंनकर (वय 32), मोहम्मद ईशाद ईश्रफली शेख (वय 29) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून हे तिघेही नालासोपारा परिसरातील राहणारे आहेत. 18 वर्षांची महिला नालासोपारा पश्चिमेकडील एका झोपडपट्टीत आपल्या पतीसोबत राहत आहे. 12 ऑगस्ट रोजी पीडित महिला घरी असताना या तीन आरोपीनी तिच्या घरी जाऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर पीडित महिला व तिच्या पतीला बाजूला असलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दिशेला नेऊन त्याठिकाणी पीडितेच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे.
शुक्रवारी पीडित महिलेने नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय दंड विधांसाहिता कलम 376 (ड), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
(संपादन : वैभव गाटे)
18 year old married women torture by 3 men in nalasopara
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.