चंद्रपूर येथील वन अकादमीसाठी 186 कोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - वित्त विभागाने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी संकुलातील नवीन इमारतीचे बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मितीसाठी 186 कोटी 9 लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. 28 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून वन अकादमीत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अकादमीचे नाव चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी असे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. वन्यजीव व्यवस्थापन आणि वानिकी उत्पादनविषयक प्रशिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी संकुलातील नवीन इमारतीचे बांधकाम तसेच पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या 186 कोटी लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने या वन अकादमीच्या निर्मितीचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.
Web Title: 186 crore for chandrapur forest academy