तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस

सुमित बागुल
Wednesday, 23 September 2020

मुंबईवरील संकट अजूनही टळलं नाहीये. येत्या चोवीस तासात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय

मुंबई : २३ सप्टेंबर १९८१ रोजी मुंबईत विक्रमी ३१८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज म्हणजेच तब्बल ३९ वर्षानंतर म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा तुफानी पाऊस पाहायला मिळाला. एकीकडे तुफानी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचं संकट अशा दोन्हींचा एकत्र सामना मुंबईकर आज करताना पाहायला मिळतोय.

आजच्या पावसाची एक खासियत हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिलीये. मागील ३९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी  म्हणजे २३ सप्टेंबर 1981 रोजी मुंबईत सप्टेंबर महिन्यातील विक्रमी ३१८.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा म्हणजे २३ सप्टेंबर रोजीच २८६.४ एवढ्या मोठ्या पावसाची नोंद झालेली आहे. 

महत्त्वाची बातमी : निषेध!  निषेध !! निषेध !!! "झुठा है तेरा वादा" ; ठाण्यात पुन्हा बॅनरवॉर

दरम्यान, होसाळीकर यांनी मागील दहा वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात मुंबईत एका दिवसात सर्वाधिक किती पाऊस पडलाय याचा एक तक्ता देखील पोस्ट केलाय. 

पुढील चोवीस तास धोक्याचे : 

दरम्यान,  मुंबईवरील संकट अजूनही टळलं नाहीये. येत्या चोवीस तासात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.  मुंबई आणि किनारपट्टी भागात पावसाचा अलर्ट जरी करण्यात आलाय.  

मुंबईकरांची टत्रेधा : 

आजच्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच त्रेधा उडवली. एकीकडे कोरोनामुळे ट्रेन बंद आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर पाणीच पाणी साठल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेले पाहायला मिळाले. मुंबईत सप्टेंबर महिन्यात सरासरी जेवढा पाऊस पडतो त्याच्या तब्बल ८० टक्के पाऊस आज झाल्याचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत. 

in 1981 mumbai withnessed similar heavy rainfall on same date 23rd September


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in 1981 mumbai withnessed similar heavy rainfall on same date 23rd September