1993 च्या बॉम्बस्फोटात स्कुटर पुरवणाऱ्या 'या' आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेडया..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला विमानतळावरून अटक । पाकिस्तानी पासपोर्टवर आला होता मुंबईत । गुजरात एटीएसची कारवाई

मुंबई : मुंबईत 1993 मध्ये साखळी स्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसा याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात गुजरात दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) यश आले आहे. मुसा हा पाकिस्तानी पासपोर्टच्या सहाय्याने दुबईत जाण्याच्या प्रयत्नात होता. 2 जानेवारीला पाकिस्तानातून अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी पाच जणांना गुजरात येथे समुद्रातून अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणात मुसाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

मोठी बातमी - क्लब वेट्रेस ते ऑस्कर विजेती, 'ही' कहाणी आहे अभिनेत्री 'रेनी झेल्विगर'ची...

'त्या' तीन स्कूटर यानेच आणल्या होत्या 

मुसा विरोधात स्फोटांप्रकरणी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. मुसा हा मुंबई स्फोटातील मास्टर माईंड टायगर मेमन याचा सहकारी असून स्फोटाच्या कटात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 1993 स्फोटात वापरण्यात आलेल्या तीन स्कूटर त्याने आणल्या होत्या. त्या मध्ये स्फोटके भरून झवेरी बाजार येथे ठेवल्या होत्या. या स्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, 713 मध्ये जण जखमी झाले होते. या स्फोटांमध्ये 27 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. या स्फोटांनंतर मुसा अंडरग्राऊंड झाला होता. त्यानंतर तो बॅंकॉकला पळाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली.

मोठी बातमी -  'म्हणून' तुमचे पैसे वाचतायत; कोरोनाचा जगावर असाही परिणाम...

'टायगर मेमन'ने बनवून दिलेत पाकिस्तानी पासपोर्ट 

मुसाकडे सापडलेला पाकिस्तानी पासपोर्ट टायगर मेमनने पाकिस्तानी यंत्रणांना हाताशी धरून तयार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्वर मोहम्मद नावाने हा पाकिस्तानी पासपोर्ट असून त्याच्या सहाय्याने तो केनियामधील नायरोबी येथे वास्तव्याला होता. या काळात तो टायगर मेमनच्या संपर्कात होता. नायरोबीमध्ये तो मॅगनम आफ्रीका नावाने व्यवसाय करत होता. त्यानंतर टायगर मेमनच्या सांगण्यावरून त्याने धान्याच्या विशेषतः तांदळाच्या आयात निर्यातीचे काम करण्यास सुरूवात केली होती.

मोठी बातमी - 'म्हणून' तुमचे पैसे वाचतायत; कोरोनाचा जगावर असाही परिणाम...

अंमली पदार्थांची तस्करी

त्याच्या आडून तो भारतात अंमली पदार्थांची तस्करी करत होता.तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या पाच पाकिस्तानींच्या चौकशीतून हा माल कराची येथील राहणाऱ्या हाजी हसन नावाच्या व्यक्‍तीचा होता. त्या हाजी सोबत मुसाने अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत संपर्क साधला होता. त्यावेळी गुजरातमार्गे स्फोटकेही पाठवण्यास मदत करण्याचे वचन हाजीने दिले होते. मुंबई स्फोटांनंतर पलायन केलेला मुसा दोनवेळा भारतात येऊन गेला आहे. या दोनही वेळी त्याने पाकिस्ताना पासपोर्टचा वापर केला होता.

मोठी बातमी - दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक!

यापूर्वी 2014 मध्ये अटारी बॉर्डर मार्गे तो भारतात आला व त्यानंतर त्याने मुंबई गाठली होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मुसाकडून पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला असून पाकिस्तानी यंत्रणांना दोनवेळा या पासपोर्टचे नुतनिकरण केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1993 serial bomb blast accused munaf halari musa arrested by gujrat ATS