उल्हासनगरात पार्टीदरम्यान गोळीबार, दोघांना अटक

Firing
Firing

उल्हासनगर : एमएमआरडीएच्या शौचालयाच्या टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत हवेत गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार शहाड रेल्वे स्थानकाजवळ घडला आहे. गोळी समोरील फ्लॅटच्या काचेला लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन तरुणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांनी दिली.

मध्यरात्री शहाड स्थानकासमोरील दिशा हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या टेरेसवर पाच सहा तरुण पार्टी करत होते. त्यावेळी या पार्टीमध्ये आलेल्या जयपाल राजपूत याने मिसफायरिंग केली. त्यामुळे शेजारील थ्री स्टार अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर राहणारे भंगार विक्रेते जहांबीर अली खान यांच्या किचनच्या खिडकीची काच फुटली. त्यावेळी खान यांचे कुटुंबीय गाढ झोपेत होते. मात्र काच फुटण्याच्याच्या आवाजामुळे किसमातून खान याना जाग आली. त्यांनी खिडकीतून डोकावून एमएमआरडीए शौचालयाच्या टेरेस वर बसलेल्या तरुणांना ओरडल्या. त्यावेळी त्या तरुणांनी तुमच्या खिडकीत रस्सी बॉम्ब फुटला आहे असे सांगितले. 

मात्र त्यांचा मुलगा शाखिर खानला किचनच्या ओटयावर पडलेल्या काचांमध्ये गोळीची पुंगळी दिसली. त्याने तात्काळ मध्यरात्रीच उल्हासनगर पोलीस स्टेशनला फोन करून सदरचा प्रकार कळवला. याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जयपाल राजपूत,विशाल वाल्मिकी यांना अटक केली असून त्यांच्या कडून गावठी पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com