esakal | दोन दिवस पावसाची धुवांधार बॅटिंग; समुद्रातही वाहणार जोरदार वारे
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains will increase in Mumbai on Sunday

दोन दिवस पावसाची धुवांधार बॅटिंग; समुद्रातही वाहणार जोरदार वारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पावसाचा (rain) जोर शुक्रवार (friday) पर्यंत कायम राहाणार असून, समुद्रही (sea) खवळेला राहाणार आहे. समुद्रात ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार आहे. काही वेळा वाऱ्यांचा ताशी 60 किलोमिटर पर्यंत पोहचेल. असा ईशारा मुंबई वेधशाळेने (IMD Mumbai) दिला आहे. त्यातच उद्या समुद्रालाही 4.39 मिटर उंचीची भरती असल्याने मोठ्या लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. तर, आज दिवसभर मुंबईत (mumbai) पावसाची रिपरीप सुरु होती. अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे वाहतुकीवरही काही प्रमाणात परीणाम झाला होता. (2 days heavy rain and Strong winds sea)

अरबी समुद्रातील पावसाच्या पोषक वातावरणामुळे संपुर्ण महामुंबईत शुक्रवार पर्यंत पावसाचा जोर राहाणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेज अलर्ट जारी केला आहे.बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी 200 मि.मी पर्यंत पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्यात होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबईत पावसाची सतत रिपरीप सुरु आहे. सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास पावसाचा जोर चांगला होता. पावसाच्या भितीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तासभर दणकून पाऊस झाल्यानंतर पुन्हा जोर ओसरला.कुलाबा येथे आज सर्वाधिक 92.94 मि.मी आणि मलबार हिल येथे 86.85 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: सॅडहर्स्ट रोडजवळील नव्या जलवाहिनीमुळे रुळांवरील पाण्याचा निचरा - BMC

पावसासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याने रविवार पर्यंत समुद्रात जोरदार वारे वाहाणार आहे. ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार असून, अधून मधून वाऱ्यांचा वेग ताशी 60 किलोमिटर पर्यंत पोहचणार आहे.स मुद्र खवळेला राहाणार असल्याने उंच लाटाही उसळण्याची शक्‍यता आहे. त्यातच गुरुवारी सकाळी 10.46 वाजता समुद्राला 4.39 मिटर उंचीची भरती येणार आहे. यामुळे समुद्राचा धोका अधिक वाढण्याची शक्‍यता आहे.

झाडपडून एक जखमी

मुंबईत आज दुपारी झाड पडून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. जोगेश्‍वरी गुंफा परीसरात ही दुर्घटना घडली. या व्यक्तीला पालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचार करुन घरी पाठविण्यात आले.

loading image