प्रसाद यांच्या लॉकरमध्ये दोन किलो सोने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले प्राप्तिकर आयुक्त (मुंबई विभाग, अपील) बी. बी. प्रसाद याच्या लॉकरमध्ये दोन किलो सोने, दोन किलो चांदीचे दागिने आणि बार आढळल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दोन कोटींची लाच घेतल्या प्रकरणी प्रसाद यांच्यासह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना प्रसाद यांचे बॅंक खाते आणि लॉकरबाबत माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने त्यांच्या घरावर छापे टाकले आणि लॉकरही जप्त केले. त्यात दोन किलो सोने आणि चांदीचे दागिने सापडले. याशिवाय त्यांच्या हैदराबादमधील काही मालमत्तांबाबतची माहितीही मिळाली आहे. त्याबाबत पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: 2 kg gold in prasad locker