Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 2 किलो सोन्याची तस्करी; आरोपी अटकेत

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने शनिवारी मीरा रोड येथील एका व्यक्तीला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली
2 kg gold smuggled Mumbai airport Accused in custody crime mumbai police
2 kg gold smuggled Mumbai airport Accused in custody crime mumbai police Sakal

मुंबई : मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने शनिवारी मीरा रोड येथील एका व्यक्तीला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे.आरोपीने बँकॉकमधून 1.29 कोटी रुपयांच्या 2.45 किलो सोन्याची भारतात तस्करी केल्याचा आरोप आहे.

आरोपीने हे सोने पायाच्या मोज्यात आणि जीन्सच्या खिशात लपवून ठेवले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयाच्या आधारे सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संजय जैन या प्रवाशाला अडवले. जैन हे एअर इंडियाच्या विमानाने बँकॉकहून मुंबईला आले होते.

चौकशीदरम्यान आरोपी संजय जैनने जाणूनबुजून सोन्याची तस्करी केल्याचे कबूल केले. यानंतर शनिवारी पहाटे सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत त्याला अटक करण्यात आली. आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने सोन्याची तस्करी केली होती का याचा तपास अधिकारी करत आहेत. आरोपीला सोने पुरवण्यात सहभागी असलेल्या त्याच्या साथीदारांची माहिती मिळविण्यासाठी कस्टम अधिकारी त्याचा फोन स्कॅन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com