ठाणे जिल्हा नियोजन समितीवर जिल्हापरिषद गटातून दोन सदस्य मुरबाडचे

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 4 मे 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत व प्राजक्ता मोहन भावार्थे या दोघांची ठाणे जिल्हा नियोजन समितीवर बिनविरोध निवड झाली आहे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसची एक सदस्या असे सहा सदस्य बिनविरोध निवडून आले.

ठाणे जिल्हा नियोजन समितीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे भाजप, शिवसेन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बोलणी केल्याने सहा सदस्य सोडून उर्वरित सदस्यांनी गुरुवारी (ता. 3) निवडणूक अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता भावार्थे भाजपचे सुभाष घरत व श्रेया गायकर शिवसेनेचे गोकुळ नाईक, सुषमा लोणे, तुळशी गिरा या सहा जणांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले

Web Title: 2 members from jilha parishad on thane jilha planning committee