पुरातून वाचलेल्या चिमुरडीचा जगण्यासाठी संघर्ष

2 months baby faces hurt disease
2 months baby faces hurt disease

मुंबई : कोल्हापूर-सांगलीत पुराने हाहाकार माजवला. अनेक संसार कित्येक आयुष्य या पुरात उध्वस्त झाली. लोकं एकमेकांच्या मदतीला धावली, एनडीआरएफ पोहोचली. एनडीआरएफ टीमने अनेक लोकांसह सांगलीतील एका 2 महिन्याच्या चिमुरडीला वाचवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात या चिमुरडीला हृदररोग झाल्याचं निदान झाल्याने तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. एकीकडे पुराचं पाणी ओसरत असलं तरी आपल्या या चिमुरडीसाठी तिच्या आई-वडलांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा अश्रूंचा महापूर दाटून आला आहे.

कोल्हापूर-सांगली भागात गेल्या 10-15 दिवसात पावसाने हाहाकार माजविला. त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावात पाणी शिरलं, अनेकांच संसार पुरात वाहून गेला.शासन आणि एनडीआरएफ टिमने रेस्क्यू आँपरेशनव्दारे अथक प्रयत्नांती अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यशस्वी झाले. पंरतू, या पुरामुळे पसरलेली रोगराई आजार यामुळे आता येथील रहिवाशांच्या तसेच लहान मुलांच्या आरोग्य धोक्यात आलेले पहायला मिळत आहे. सांगलीतील शिंदे कुटूंबिंयाना त्यांच्या 2 महिन्याच्या चिमुरडीला वाचविण्यात एनडीआरएफ टिमला यश आले पंरतू ही चिमुरडी पुराच्या पाण्यामुळे न्युमोनिया ग्रस्त झाली. पुढे, उपचार सुरू असताना समजले की तिला हदयदोष असल्याचे समोर आल्याने शिंदे कुटूंबिय तर जागीच गळून पडले. आधीच पुरामुळे झालेली दैना आणि आता शिवण्याला असलेला हदयदोष या बातमीने पुर्णता ते कोलमडून पडले आहे. पुढिल उपचारासाठी मुंबईला हलविणे गरजेचे असल्यने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांनी मुंबई गाठली व आता तिच्यावर मुंबईतील वाडीला रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

भाजी विक्रेता असलेल्या संदिप शिंदे त्यांची पत्नी यांचा संसार पुर्णतः पुरात वाहून गेला. पुरातून पुन्हा उभारी कशी घ्यायची या विवंचनेत असतानाच त्यांच्यावर दुसरा मोठा आघात म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुरडीला हदयदोष असल्याची बातमी. आता शिवण्याला या जिवनमरणाच्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी शिंदे कुटूंबियासह वाडीया रूग्णालय ही अथक प्रयत्न करत आहेत. तिला वाचविण्यासाठी वाडीया रूग्णालयात सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com