ठाण्यात चोरीचे 20 डंपर जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

ठाणे - महाराष्ट्र आणि गुजरातमधून चोरी केलेल्या अवजड वाहनांची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणाऱ्या 10 जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 डंपर जप्त केले आहेत. अटक आरोपींपैकी प्रादेशिक परिवहन विभागातील दोन एजंट असून, अद्याप नऊ जण फरारी असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

भिवंडीत डिसेंबर 2017 मध्ये एका तक्रारदाराने डंपर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. याचा तपास करीत असताना शकील शेख याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याच्याकडे काही संशयास्पद कागदपत्रे आढळली. यानंतर मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

ही टोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांची चोरी करून इंजिन आणि नंबर प्लेटमध्ये फेरफार करत. प्रादेशिक परिवहन विभागातील दलालांच्या मदतीने बीडमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करत. चोरीची वाहने 25 ते 30 लाखांपर्यंत विकली जात असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे.

Web Title: 20 dumper seized in thane