मुंबईत 20 लाख धनादेश रखडले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - सार्वजनिक बॅंकांच्या दोन दिवसांच्या संपामुळे बॅंकिंग व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. संपामुळे क्‍लिअरिंग यंत्रणा कोलमडल्यामुळे 20 लाख धनादेश पडून आहेत. ही यंत्रणा सुरळीत होण्यासाठी आठवडा लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. एटीएम यंत्रणेला त्याचा फटका बसला असून, संप यशस्वी झाल्याचा दावाही बॅंक कर्मचारी संघटनांनी केला आहे. 

वेतनवाढीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी दोन दिवसांचा संप पुकारला होता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातून रोज 10 लाख धनादेशांचे क्‍लिअरिंग होते. संपामुळे दोन दिवसांपासून क्‍लिअरिंग यंत्रणा कोलमडली आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बॅंकिंग युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. क्‍लिअरिंग यंत्रणा पूर्ण होण्यास किमान आठवडा लागेल, असे त्यांनी सांगितले. सरकारी व्यवहार स्टेट बॅंकेतून चालतात. त्यांच्यावर या बंदचा परिणाम झाला आहे. मुंबईतील दहा हजार एटीएम आहेत; मात्र एजन्सींना बंद कालावधीत बॅंकांकडून पैसेच न मिळाल्याने जवळपास पाच हजार एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

संपात सहभागी  
- बॅंकांच्या शाखा- 4000 
- बॅंक कर्मचारी : 25,000 

Web Title: 20 million checks held in Mumbai