Chhatrapati Sambhaji Nagar Violence: छ. संभाजीनगरनंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा, २० जण पोलिसांच्या ताब्यात | Ram Navami Violence | Latest Marathi News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Rama Navami Shobha Yatra Malad Malvani area

Sambhaji Nagar Violence: छ. संभाजीनगरनंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा, २० जण पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhaji Nagar Violence: छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री समाजकंटकांनी दगडफेकसह पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स फेकल्याची घटना घडली.

त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा झाला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभा यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती पण आता नियंत्रणात आहे. परिसरातील वातावरण धोक्यात आणल्याप्रकरणी 300 हून अधिक अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहितीही पोलिसांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

नेमकं प्रकरण काय?

रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.

शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbai NewsRam Navami