गिरगांवात 2000 कापडी पिशव्यांचे वाटप 

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 25 जून 2018

मुंबई : सकाळ माध्यमाने राज्यभर पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेली प्लास्टिक बंदीची जनजागृतीची जोरदार मोहिम आणि त्यास लाभलेली पर्यावरण प्रेमींची साथ याचा व्हायचा तोच परिणाम होऊन अखेर शासनाने प्लास्टिक बंदी पुकारली आहे. या साठी विशेष म्हणजे 
शिवसेनेच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा खास आग्रह पर्यावरण मंत्री रामदास कदम व राज्य सरकारने केलेली प्लास्टिक बंदी होय. याच प्लास्टिक बंदीचे स्वागत करीत आम्ही गिरगावकर टीम तर्फे गिरगावातील विविध चाळी, इमारती येथे घरोघरी जात तब्बल 2000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

दक्षिण मुंबईतील चिरा बाजार, गिरगांव जंक्शन, ठाकुरद्वार, तसेच गिरगांवातील असंख्य चाळीत व बिल्डिंग मध्ये 2000 कापडी पिशव्यांचे  वाटप करताना प्लास्टीक पिशव्यांचा वापर तात्काळ थांबवून सरकारला सहकार्य करा. आपल्या पृथ्वी, निसर्गाचे,पर्यावरणाचे संरक्षण करावे असा संदेश आम्ही गिरगावकर चे स्वयंसेवक लोकांना देत होते.

प्लास्टिक बंदीसाठी खरे तर गत गणेशोत्सवा पासून सकाळ माध्यमाने प्लास्टिकचा भस्मासुर संपवा अशी मोहिम राज्यभर उघडली होती. त्याचा जबरदस्त परिणाम झाल्याचे आजही प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात आम्ही गिरगावकर टीमचे सदस्य म्हणाले की, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र शासन व मुंबई महानगर पालिका यांनी जो प्लास्टिक बंदी चा निर्णय जो घेतला त्यास अनुसरुन आम्ही देखील समाजाचे काही देणे लागत आहोत याच उद्देशाने काल (ता. 24) आम्ही चिरा बाजार, गिरगांव जंक्शन, ठाकुरद्वार, व तसेच गिरगांवातील असंख्य चाळीत व बिल्डिंग मध्ये 2000 कापडी पिशव्यांचा वाटप करीत आहोत. नागरिकांनी याचे स्वागत करुन सरकार व मुंबई महानगर पालिकेला सहकार्य करावे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची होणारी हानी थांबुन पावसाळ्यात मुंबई तूंबण्याची कायमची थांबेल.

Web Title: 2000 cloth bags distributed in girgao