20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने 20 डिसेंबरला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. याबाबत नाराजी दर्शवण्यासाठी मार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रास्ता रोकोबाबत पूर्वकल्पना दिली आहे. 

औरंगाबाद आणि जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांवर झालेला हल्ला, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी पासची सोय, डॉक्‍टरांवर हल्ला झाल्यास तत्काळ माहिती मिळण्यासाठी सरकारी रुग्णालयात अलार्म सिस्टीम, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे निवासी डॉक्‍टरांविरोधातील हल्ल्यांविरोधातील चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करणे याबाबत अद्यापही वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर)ने निर्णय घेतलेला नाही. महिला निवासी डॉक्‍टरांची प्रसूती रजा, क्षयरोगाच्या उपचारांसाठी रजा, स्टायपनमध्ये वाढ याबाबत अद्यापही सक्षम निर्णय झालेला नसल्याची तक्रारही मार्डने मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

अनेक मागण्या 
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना अद्यापही बंधपात्रता प्रक्रिया अद्यापही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेली नाही. या प्रक्रियेतील त्रुटीही मार्डने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. वैद्यकीय रुग्णालयांतील औषधे व साहित्यांच्या तुटवड्यावर काम करण्यासाठी ऑडिट समितीची स्थापना करणे, सरकारी रुग्णालयांत चोवीस तास निवासी डॉक्‍टरांसाठी उपाहारगृहांची सोय करणे आदी मागण्याही मार्डने केल्या आहेत. 

Web Title: On 20th December the protesters stopped the movement by resident doctors