मुंबई - राज्यात विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या 21 शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील 20, तर बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी 20 शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द केली आहे. या नियुक्त्यांसाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घेतली नाही. प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असूनही 2017-18 मध्ये आंतरजिल्हा बदलीने प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही. या प्रतिनियुक्त्यांमुळे मूळ नेमणूक असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी रद्द केली आहे.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पनवेल येथील 11, नांदेड येथील एक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईतील पाच, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील तीन प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
|