‘रायगड भूषण’ तब्बल १८६

रायगड भूषण पुरस्कार साेहळ्यासाठी झालेली गर्दी.
रायगड भूषण पुरस्कार साेहळ्यासाठी झालेली गर्दी.

अलिबाग : वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तब्बल 186 जणांना  जिल्हा परिषदेच्या वतीने "रायगड भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच वर्षी इतक्‍या मोठ्या संख्येने पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला. 

अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात पुरस्कार सोहळा झाला. खासदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, शिक्षण सभापती नरेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंडे, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या ऍड. नीलिमा पाटील, चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
जिल्हयातील क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, धार्मिक, सांस्कृतिक, अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 186 जणांना "रायगड भूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

एवढ्या मोठ्या संख्येने "रायगड भूषण' प्रदान करण्यात आल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम झाला, अशी चर्चाही रंगली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com