विजयी उमेदवारांमध्ये 22 टक्के गुन्हेगार!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तींनी राजकीय वाट धरल्याचे नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित झाले आहे. 22 टक्‍के अपक्षांसह सर्वच राजकीय पक्षांतून निवडून आलेले काही उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यातच भाजपचे उमेदवार सर्वाधिक आहेत.

एका स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीतून ही माहिती उघडकीस आली आहे. या संस्थेने सुमारे 1220 विजयी उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यातील 268 विजयी उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असल्याचे दिसून आले. यात भाजपचे सर्वाधिक 100 उमेदवार आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेचे 77, राष्ट्रवादीचे 36, कॉंग्रेसचे 29, तर मनसेचे आठ उमेदवार आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, मानवी तस्करी, अपहरण, दरोडा, दादागिरी, फसवणूक आदी गुन्हे या उमेदवारांवर दाखल आहेत.

Web Title: 22% criminal in winner candidate