Mumbai Crime : ४६ वर्षांच्या आईची हत्या करुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबईतील धक्कादायक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Crime News
४६ वर्षांच्या आईची हत्या करुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबईतील धक्कादायक घटना

४६ वर्षांच्या आईची हत्या करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईतील मुलुंड येथे २२ वर्षांच्या तरुणाने आईची हत्या केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. छाया पांचाळ (वय ४६) असे या मृत महिलेचे नाव असून जयेश पांचाळ (वय २२) असे या आरोपी मुलाचे नाव आहे. आईची हत्या केल्यानंतर जयेशने ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या जयेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Crime News)

हेही वाचा: Video: कारचालकाने समोर आलेल्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

मुलुंड पश्चिमेतील वर्धमान नगर येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पांचाळ कुटुंबीय राहतात. छाया, त्यांचा मुलगा जयेश आणि पती महेश असे हे कुटुंब. महेश पांचाळ यांचा व्यवसाय असून जयेशने गेल्या वर्षीच इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. शनिवारी संध्याकाळी महेश हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान जयेशने आईवर चाकूने हल्ला केला. यानंतर जयेश घरातून पळून गेला. जयेशच्या हल्ल्यात छाया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोसायटीतील अन्य सदस्यांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली. (22 year old son kills mother in mulund)

मुलुंड पोलिसांच्या पथकाने जयेशचा शोध घेतला असता तो मुलुंड येथील रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जयेशच्या खिशात चिठ्ठी असून ही चिठ्ठी गुजराती भाषेत असल्याचे समजते. मुलुंड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पांचाळ कुटुंबात संपत्तीवरुन वाद होता. यामुळे जयेश नैराश्यात होता, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

Web Title: 22 Year Old Son Kills Mother In Mulund Property Dispute Depression Crime News Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..