रिंग रोल'मधून दे दणादण आतषबाजी

प्रमाेद जाधव
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

फटाक्‍यांच्या आतषबाजीवर गेल्या वर्षीपासून सर्वोच्च निर्बंध आले आहेत. त्यामुळे अनेकांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांकडे पाठ फिरवली आहे. विक्रेतेही व्यवसाय मंदावला असल्याचे सांगतात. या पार्श्‍वभूमीवर यंदा बच्चे कंपनीनेही मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांपेक्षा दिवाळीतील बंदुकांना पसंती दिली आहे. त्यामध्ये "रिंग रोल बंदूक' अधिक पसंत आहे. 

अलिबाग (बातमीदार) : दिवाळी म्हणजे मिठाई, फराळ असे समीकरण असले, तरी बच्चे कंपनीसाठी प्रकाशाचा हा उत्सव फटाक्‍यांमुळे खास असतो. यंदा नवीन प्रकारचे नानाविध फटाके आले असले, तरी बाजारात "रिंग रोल बंदूक'च अधिक पसंतीला उतरत आहे. चिनी बनावटीची ही बंदूक आहे. ती अवघ्या 50 रुपयांपासून मिळते. हाताळण्यास सोपी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक चांगली आहे. 
फटाक्‍यांच्या आतषबाजीवर गेल्या वर्षीपासून सर्वोच्च निर्बंध आले आहेत. त्यामुळे अनेकांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांकडे पाठ फिरवली आहे. विक्रेतेही व्यवसाय मंदावला असल्याचे सांगतात. या पार्श्‍वभूमीवर यंदा बच्चे कंपनीनेही मोठ्या आवाजाच्या फटाक्‍यांपेक्षा दिवाळीतील बंदुकांना पसंती दिली आहे. त्यामध्ये "रिंग रोल बंदूक' अधिक पसंत आहे. 
पूर्वी एकदा आवाज झाल्यावर पुन्हा टिकली बंदुकीला लावून आवाज करण्यात येणाऱ्या बंदुका होत्या. त्यानंतर "रोल कॅप' बाजारात दाखल आली. मात्र आता खरीखुरी दिसेल अशी बंदूक बाजारात दाखल झाली आहे. "प्लास्टिक रिंग रोल बंदूक' म्हणून ती ओळखली जाते. ती हाताळणे अगदी सोपे आहे. त्यामुळे तिची अधिक खरेदी होत आहे. या बंदुकीची किंमत 50 रुपयांपासून 400 रुपये आहे. "रिंग रोल'ची किंमत दहा रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा