लालबागमध्ये २३ फुटी कागदी मखर

रजनीकांत साळवी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

प्रभादेवी - राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत गणपतीसाठी सजावट साहित्य निर्माण करणाऱ्यांनी अनोखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लालबागच्या उत्सवी कार्यशाळेतील कलाकारांनी कागदी पुठ्ठ्यांपासून फोल्डिंगचे मखर बनवले आहेत. ग्राहकांकडूनही अशा टिकाऊ आणि पुनर्वापरयोग्य मखरांना चांगली मागणी आहे.

गणेशचतुर्थीत वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या सजावटी साहित्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. विसर्जनानंतर सर्व साहित्य नदी आणि समुद्रात सोडले जाते. याला पर्याय म्हणून लालबागच्या ‘उत्सवी’ कार्यशाळेत कागदी पुठ्ठ्यांपासून बनवले जाणारे शंभरहून अधिक मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. थर्माकोलपासून होणारे प्रदूषण, प्लास्टिक व थर्माकोलबंदी झाल्यानंतर ‘उत्सवी’ने थर्माकोलपासून कलाकृती बनवण्यासाठीचा दोन एकर क्षेत्रातील थर्माकोलचा कारखाना बंद केला, अशी माहिती ‘उत्सवी’चे संस्थापक मालक नानासाहेब शेंडकर यांनी दिली. ५० कलाकारांच्या साह्याने २३ फुटी कागदी पुठ्ठ्यांचे मखर सहा महिन्यांत तयार केले. हे मखर गणपती सजावटीनंतर घडी करून ठेवले जाऊ शकतात, असे शेंडकर यांनी सांगितले.

तरुणांना रोजगार 
एकूण १०० कलाकार या कागदी पुठ्ठ्यांपासून बनवल्या जाणाऱ्या कलाकृती साकारत आहेत. महिला, तरुण, बचत गटांना याचे कौशल्य शिकवण्यासाठी उत्सवीने पुढाकार घेतला आहे. थर्माकोल व प्लास्टर ऑफ परिसपासून बनवण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या सजावटी मखरांची किमत ५ ते १० लाखांपर्यंत असते; मात्र त्यांच्या तुलनेने कागदी मखराची किंमत अडीचशेपासून एक लाखापर्यंत आहे, अशी माहिती उत्सवीचे  नानासाहेब शेंडेकर यांनी दिली. 

Web Title: 23 feet of paper makhar in Lalbagh

टॅग्स