जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकापासून कान, नाक आणि घसा अशी 17 विशेष डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि क्षयरोग तज्ज्ञ या पदांव्यतिरिक्त उर्वरित 16 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात "एनआरएचएम'द्वारे कंत्राटी स्वरूपात 11 डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. त्यांचे मानधन अनेक महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.
अलिबाग : अलिबाग जिल्हा रुग्णालयातील 11 कंत्राटी तज्ज्ञ डॉक्टरांनी थकीत वेतन मिळावे यासाठी 14 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या डॉक्टरांबरोबरच शिकावू डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णालयाचा कारभार आहे. त्याचा परिणाम कामकाजावर झाला असून उपचाराअभावी अनेक रुग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकापासून कान, नाक आणि घसा अशी 17 विशेष डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि क्षयरोग तज्ज्ञ या पदांव्यतिरिक्त उर्वरित 16 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात "एनआरएचएम'द्वारे कंत्राटी स्वरूपात 11 डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. त्यांचे मानधन अनेक महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.
कंत्राटी तज्ज्ञ डॉक्टर संपावर गेल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून ठोस भूमिका घेतली नाही, असे समजते. त्यामुळे रुग्णालयाचा कारभार शिकावू डॉक्टरांच्या खांद्यावर आहे.
डॉक्टर संपावर गेल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने परत जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
- नितेश शिंदे, रुग्णाचे नातेवाईक.
जिल्हा रुग्णालयातील विशेष तज्ज्ञ संपावर गेले आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टरांचा मदतीने रुग्णांना सेवा सुरू आहे. सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
- ऍड. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.