दिवा स्थानकात थांबणार 24 जलद लोकल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई - दिवा स्थानकात रविवारपासून (ता.18) जलद लोकल थांबवण्यास सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले असून 24 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, आधीच खचाखच गर्दी झालेल्या कर्जत, कसारा, खोपोली, टिटवाळा व बदलापूरच्या लोकल दिवा स्थानकात 30 सेकंद थांबवल्यास किती प्रवासी चढू शकतील, याबाबत साशंकता आहे.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-2 अंतर्गत असलेल्या ठाणे-दिवा दरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या-सहाव्या मार्गावरील जलद लोकलना थांबा देण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वे व मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये चार जम्बो मेगाब्लॉक घेतले. जलद लोकल थांबवण्यासाठी दोन नवीन फलाट बांधण्यात आले. मेगाब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या फलाटांचे शिल्लक काम व गाड्यांमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी दोन महिने लागले. अखेर रविवारी (ता. 18) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मुंबई दौऱ्यात दिवा स्थानकात जलद लोकल थांबवण्याची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.

जलद लोकलच्या वेळा
खोपोलीच्या दिशेने सीएसटीच्या दिशेने
सकाळी 6.57 वा. सकाळी 6.55 वा.
सकाळी 8.40 वा. सकाळी 8.08 वा.
सकाळी 9.16 वा. सकाळी 9.09 वा.
सकाळी 10.02 वा. सकाळी 10.50 वा.
सकाळी 10.29 वा. सकाळी 11.34 वा.
सकाळी 11.07 वा. दुपारी 1.04 वा.
दुपारी 12.09 वा. दुपारी 1.53 वा.
दुपारी 2.02 वा. दुपारी 2.56 वा.
सायं. 6.08 वा. सायं. 5.01 वा.
सायं. 6.47 वा. सायं. 5.36 वा.
सायं. 7.07 वा. सायं. 6.49 वा.
रात्री 9.36 वा. सायं. 7.45 वा.

Web Title: 24 fast trains stop diva station