नव्या वर्षात मुंबईत 24 तास पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - नव्या वर्षात मुंबईत 24 तास पाणी योजना राबविण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी वाचविण्याच्या उपाययोजनाही राबवण्यात येतील.

मुंबई - नव्या वर्षात मुंबईत 24 तास पाणी योजना राबविण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी वाचविण्याच्या उपाययोजनाही राबवण्यात येतील.

मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा आदी धरणांतून दररोज तीन हजार 700 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. वांद्रे पश्‍चिम तसेच मुलुंड या दोन भागांत 24 तास पाणी पुरविण्याचे नियोजन केले जात आहे. या भागांतील झोपडपट्ट्यांचा अभ्यास केला जात आहे. टप्प्याटप्प्याने विभागवार 24 तास पाणीपुरवठ्याची योजना नव्या वर्षात तयार करण्यात येईल, असे जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 24 hours water mumbai in new year